धर्मवीर प्रतिष्ठाण तर्फे ५ टँकर द्वारे पिण्याच्या पाण्याच्या सोयी साठी मोफत पाणीपुरवठा

: मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसरात भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे , परिसरातील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे , हि गोष्ट लक्षात घेऊन “धर्मवीर प्रतिष्ठाण ” तर्फे पिण्याच्या पाण्याच्या सोयी साठी मोफत पाणीपुरवठा करण्यात येत आहे, या साठी ५ टँकर द्वारे, एक टँकर दुष्काळी परिस्थिती असेपर्यंत नित्य मोफत जलसेवा करण्यात येईल.