धर्मवीर प्रतिष्ठाण चा उद्देश


धर्मवीर प्रतिष्ठाण चा उद्देश :
·        आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देणे, शिबिरे राबविणे,
·        महिलांसाठी व सुशिक्षित बेरोजगारांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण व संशोधन केंद्र चालविणे.
·        राष्ट्रहितार्थ उपक्रम सुरु करून राबविणे,
·        समाजसेवा - श्रमदान शिबिराचे आयोजन करणे,
·        वृक्षारोपण राबविणे,
·        व्यसनमुक्ती कार्यक्रम राबविणे.
·        लोककलांचे जतन व संवर्धन करण्यासाठी उपक्रम राबविणे,
·        सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे,
·        व्याख्यानमाला सुरु करणे,
·        मुलामुलींच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणे , ग्रामीण व शहरी भागात प्राथमिक व माध्यमिक विद्यालय साठी मदत करणे ,
·        क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिरे तसेच स्पर्धांचे आयोजन करणे,
·        गरीब, मागास विध्यार्थ्यांना मदत करणे, ज्ञानवंत, गुणवंत, प्रज्ञावंत यांचा गौरव करणे,
·        राष्ट्रीय अभियान चळवळीत सहभागी होणे,
·        ग्रामीण भागातील युवक व युवतींसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे.
·        ग्रामीण भागातील जलसंधारण, सामाजिक वनीकरण, पर्यावरन विकास कामातून समाजाचा विकास करणे.
·        ग्रामीण व शहरी भागात ग्राम स्वच्छता अभियान चालवणे.
·        ग्रामीण व शहरी भागातील युवक, युवती व बालकांसाठी औपचारिक अनौपचारिक विषयक शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे.
·        ग्रामीण व शहरी भागातील महिला व पुरुषांचे बचतगट प्रशिक्षण देणे व स्थापन करणे.
·        ग्रामीण व शहरी भागात युवक व युवतींसाठी माध्यमिक व उच्चमाध्यमिक तसेच बालवाड्या, वैद्यकीय दवाखाना, तंत्रज्ञान महाविद्यालये सुरु करण्यासाठी मार्गदर्शन करणे व चालविणे.
·        ग्रामीण व शहरी भागातील जनतेसाठी एड्स, कृष्ठरोग, क्षयरोग, पल्स पोलिओ लसीकरण, कुपोषण इ. जनजागरण करून तसेच सेवा उपलब्ध करून देणे व त्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे.
·        झोपडपट्टी गलीच्च वस्ती सुधार, दुर्लक्षित घटकांतील समाजासाठी विविध  योजना राबविणे.
·        महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी ग्रामीण, शहरी व आदिवासी भागात प्रशिक्षण केंद्र चालविणे व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणे, परित्यक्ता, घटस्फोटीत स्त्रियांसाठी आश्रम स्थापन करणे, महिला सल्ला केंद्र सुरु करणे, बाल संस्कार केंद्र सुरु करणे.